Friday, March 8, 2024

निवडक अभंग, भजन व गाणी

गणपतीचे गाणी आणि भजन











भजन





























२९. धन्य धन्य जन्म ज्याचा

गौळण


















देवींची गाणी




खंडेरायाची गाणी





साईबाबांची गाणी



इतर







हिंदी भजन 





निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव

निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव,शकुन सांगावया आले ‘यमाई’ माझे नाव I
तये नगरी वस्ती केली  मी तरी आले एकभावे,
ऐसा माझा शकुन दादा चित्त देऊनी ऐकावे I
कैकाय कैकाय बाबा दुरील माझा देश  ,
शकुन सांगावया मी आले कलियुगास ,
ब्रम्हा विष्णूमहेश पुसती शकुन आम्हास
ऐसे निदान आम्ही सांगितले त्यास I
धरित्री आकाश मज देखता उत्पती
चंद्र सूर्य दादा मज देखता होती,
ब्रम्हा विष्णूमहेश मज देखता उपजती
जेथे आहे शिव तेथे आदिशक्ती I
दाही अवतार मज देखता झाले
अकराही रुद्र होऊनिया गेले ,
अठ्ठ्यांशी  ऋषी मज देखता जन्मले ,
ब्रम्हादि  तेहतीस कोटी देव खेळविले I
अठ्ठावीस युगे झाली कौरव पांडव गेले दादा नेणो किती,
छप्पन्न  कोटी यादव गेले दादा कोण पंथी,
आम्ही तुम्ही जाऊ मागे कोणी न राहती I
पृथ्वीमध्ये दादा एक विपरीत होईल ,
बहिण भावा दोघा जणाचा विवाह लागेल
पाच वरुषांची बाला भ्रतार मागेल,  
सहा वरुषांची नारी गर्भिणी होईल  I
आणिक एक दादा माझा ऐकावा बोल
पृथीवरी वारा झुंझार सुटेल,   
थोर थोर दादा पर्वत उडोनी जातील
अठराही जाती एके ठिकाणी जेवतील I
कलियुगाची दादा ऐकावी थोरी
पुत्र तो पित्याचा होईल वैरी  
भ्रतार सोडोनी घरोघरी फिरतील नारी
ऐसा माझा शकुन दादा ऐका निर्धारी I
आणिक एक दादा माझे ऐका उत्तर
आकार जाईल अवघा होईल निराकार II
जाती चंद्र सूर्य मग पडेल अंधकार,
धरित्री आकाश जाईल मग कैचा दिनकर I
आणिक एक शकुन माझा ऐकावा संती
तुम्ही मूळपीठी  राहणे नाव माझे आदिशक्ती ,
अंबेचा व्यवहार  त्राहे त्राहे आदिमुर्ती
 एका जनार्दनी प्रसन्न झाली आदिशक्ती I

आला ग बाई मागल्या दारान

आला ग बाई मागल्या दारान
चोरी केली या नंदाच्या पोरांन || धृ ||

बसले होते मी दारात, अवचित आला घरात
याने ग बाई पदर ओढीला ||१||
चोरी केली या नंदाच्या पोरांन

बसले होते मी न्हानित गुलाबाचे फुल वेणीत
याने ग बाई पदर ओढीला ||२||
चोरी केली या नंदाच्या पोरांन

बसले होते मी अंगणात, अवचित आला हा रिंगणात
याने ग बाई पदर ओढीला ||३||
चोरी केली या नंदाच्या पोरांन

एका जनार्दनी नंदाचा कान्हा, देव महात्मा कळे ना कोणा
याने ग बाई पदर ओढीला ||४||
चोरी केली या नंदाच्या पोरांन

अंत नको पाहू जीव व्याकूळ झाला

अंत नको पाहू जीव व्याकूळ झाला
तुझ्या दर्शनाची ओढ लागो मनाला

रोज रोज हित हा जीव, जीव भयभीत झाला
दार बंद करूनी देवा गप्प तू का झाला
चूक झाली या मानवा कर माफ त्याला
तुझ्या दर्शनाची ओढ लागो मनाला ||१||
अंत नको पाहू जीव व्याकूळ झाला

गोर गरीबांचा जीव काकुळतीला आला
शिक्षा मोठी दिली देवा पश्र्चाताप झाला
संकट दूर करूनी तार पामराला
तुझ्या दर्शनाची ओढ लागो मनाला ||२||
अंत नको पाहू जीव व्याकूळ झाला

संसाराचा खेळ सारा पालटूनी गेला
नशिबाचा डाव देवा बंद का तू केला
देह सारा थकला व्यथा सांगू कुणाला
तुझ्या दर्शनाची ओढ लागो मनाला ||३||
अंत नको पाहू जीव व्याकूळ झाला

हे देवा मल्हारी

हे देवा मल्हारी
देवा जागरणाला यावे
भक्ताला तू पावन व्हावे
होहून कैवारी
हे देवा मल्हारी

जागरण मांडीला दारी
केली आरास मी भारी 
म्हाळसा बानू घेऊन यावे
येऊनिया दर्शन द्यावे
देऊन ललकारी
हे देवा मल्हारी

सोन्याची जेजुरी
नवलाख पायरी
महिमा तुझा भारी मोठा
सुखाला नाही कसला तोटा
माझ्या या संसारी
हे देवा मल्हारी

बानू म्हाळसा या दारी
मधी शोभे तू मल्हारी
नामाची ही लागे गोडी
अशा मजली थोडी थोडी
धावा तू श्री हरी
हे देवा मल्हारी

टाच मारून घोड्याला

रूप घेऊन म्हाताऱ्याच 
राखी बानूच्या मेंढराला
आसून जेजुरीचा राजा
गेला बानूच्या वाड्याला

शिव अवतारी, मार्तंड मल्हारी
शिव अवतारी, मार्तंड मल्हारी
मनात ठेवून बानूला
टाच मारून घोड्याला
निघाला बानूच्या वाड्याला

अशी नारदाची वाणी 
देवाच्या पडता कानी
कळ लावली नार दाणी
डाव जिकली माळसा राणी
डाव जिकली माळसा राणी
डाव जिकली माळसा राणी
डाव जिकली माळसा राणी

देव झाला म्हातारा
फट पडली जोड्याला
देव झालो म्हातारा
फट पडली जोड्याला
माळसा पडली कोड्याला

टाच मारून घोड्याला
निघाला बानूच्या वाड्याला

टाच मारून घोड्याला
निघाला बानूच्या वाड्याला

शिव शंभूचा अवतार
माझा मार्तंड मल्हार
दिल्या वाचनाला जगला
झाला बानूचा भरतार
झाला बानूचा भरतार
झाला बानूचा भरतार
झाला बानूचा भरतार

शिव शंभूचा अवतार
माझा मार्तंड मल्हार
दिल्या वाचनाला जगला
झाला पारूचा भरतार

विशाल ईश्वरा, सांभाळी लेकरा
विशाल ईश्वरा, सांभाळी लेकरा
सुखी ठेव गाव गाड्याला

टाच मारून घोड्याला
निघाला बानूच्या वाड्याला

टाच मारून घोड्याला
निघाला बानूच्या वाड्याला

शिव अवतारी, मार्तंड मल्हारी
शिव अवतारी, मार्तंड मल्हारी

मनात ठेवून बानूला
टाच मारून घोड्याला
निघाला बानूच्या वाड्याला

टाच मारून घोड्याला
निघाला बानूच्या वाड्याला

टाच मारून घोड्याला
निघाला बानूच्या वाड्याला
टाच मारून घोड्याला
निघाला बानूच्या वाड्याला

गेला हरी कोण्या गांवा

गेला हरी कोण्या गांवा 
कुणाला नाहीं कसा ठावा 
घुमेना गोकुळात पावा
ग उडतो डोळा डोळा बाई डावा

रमती कुन्जवनी बाला
असावा तिथे नंदलाला
कुणी जा आना मुकुन्दाला
जीवा हा वेळा पिसा झाला
हरिचा शोध कुणी लावा
ग उडतो डोळा डोळा बाई डावा...

कुणाशि केला जरी दंगा
मला येऊन झनि सांगा 
त्यास दाखवीन मी इंगा
नकोपन लपऊ श्रीरंगा 
माझा श्याम मला दावा 
ग उडतो डोळा डोळा बाई डावा

कधी न झाली आजवर्ती
ग नज़रे आड़ कृष्ण मूर्ति
अस्ता गोपी सदा भवति
कशी मग पडली भूल पूर्ति
हरी चा किती करू धावा
ग उडतो डोळा डोळा बाई डावा

राधा घरात जर नाहीं
कोणी जा संजयास पाहि
वडा खाली यमुने दोही
धरुनि आना गे लव लाहि
त्याचा कढला कृष्ण कावा
ग उडतो डोळा बाई डावा

गेला हरी कुन्या गांवा 
कुणाला नहीं कसा ठावा 
घुमेना गोकुळात पावा
ग उडतो डोळा डोळा बाई डावा

जनी संगे देवा ओढीयलेसे जाते

जनी संगे देवा ओढीयलेसे जाते
जोडलेसे नाते पांडुरंगा, पांडुरंगा || धृ ||

गोऱ्या कुंभारानं तुडविले बाळ 
केला प्रतिपाळ पांडुरंगा || १ ||

सावत्या माळ्याची खुडलीस भाजी
बांधीलेस ओझे पांडुरंगा || २ ||

नामा म्हणे देवा लागतो मी पायी
कृपा असू द्यावी पांडुरंगा || ३ ||

धन्य धन्य जन्म ज्याचा

धन्य धन्य जन्म ज्याचा वारकरी पंढरीचा ।।१।। जाय नेमें पंढरीसी । चुकों नेदी तो वारीसी ।।२।। आषाढी कार्तिकी । सदा नाम गाय मुखीं ।।३।। एकाजर्नाध...