सांग सुदाम्या हरीचा चेंडू |
पाण्यात गेला कसा ||
हा जीव माझा, हा जीव माझा |
झालाय वेडा पिसा || धृ ||
जमली सगळी गोकुळ नगरी |
अजुनी येई ना कसा || १ ||
गाई वासरे हंबरती |
रानात बसला कसा || २ ||
एका जनार्दनी पूर्ण कृपेने |
कंस मामा मारिला कसा || ३ ||
-- संतश्रेष्ठ श्रीएकनाथ महाराज
No comments:
Post a Comment