कृपा करी मजवरी न मस्तक ठेवितो चरणावरी,
गजानना गजानना पर्वतीनंदना मोरया गजानना
गजाननाची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी ||धृ||
टाळ वाजे, वीणा वाजे, वाजे मृदंग
टाळ्यांच्या नादे गजानन नाचण्यात दंग ||१||
हिरवा चाफा, पिवळी फुले त्यात गुंफला तुरा
पार्वतीचा पुत्र गजानन त्याची सेवा करा ||२||
संतमंडाळीने पत्र पाठविले ओझर गावाला
पत्र वाचून आनंद झाला विघ्नहर्त्याला ||३||
No comments:
Post a Comment