Friday, December 17, 2021

तुझिया सत्तेने वेदांसी बोलणे

तुझीया सत्तेने वेदांसी बोलणे |
सूर्यासी चालणे तुझीयाबळें ||धृ||

ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी |
वर्म जाणूनिया शरण आलो ||१||

मेघांनी वर्षावे पर्वती बैसावे |
वायूने विचरावे सत्ते तुझे ||२||

नामा म्हणे कांही न कळे साचार |
प्रभू तूं निर्धार पांडुरंगा ||३||

No comments:

Post a Comment

धन्य धन्य जन्म ज्याचा

धन्य धन्य जन्म ज्याचा वारकरी पंढरीचा ।।१।। जाय नेमें पंढरीसी । चुकों नेदी तो वारीसी ।।२।। आषाढी कार्तिकी । सदा नाम गाय मुखीं ।।३।। एकाजर्नाध...