देव इंद्रायणी थांबला,
देव देव इंद्रायणी थांबला ||धृ||
पंढरीचा पांडुरंग आळंदीसी आला |
भक्ती भावाने एकरूप झाला ||१|||
ज्ञानोबा माऊली तुकाराम ....... |
म्हणे मुक्ताबाई चमत्कार झाला |
समाधी घेता हात थरथरला ||२||
ज्ञानोबा माऊली तुकाराम ....... |
एका जनार्दनी इंद्रायणी आठवा |
उजळून निघाले आळंदी हे गाव ||३||
ज्ञानोबा माऊली तुकाराम ....... |
-- संतश्रेष्ठ श्रीएकनाथ महाराज
No comments:
Post a Comment