Wednesday, January 5, 2022

विठू रायाची नवरी झाली ग

अशी रुक्मिणी बावरी झाली ग

                विठू रायाची नवरी झाली ग || धृ ||


चंद्राला मिळाली चांदणी,

विठ्ठला मिळाली रुक्मिणी,

धरणी माता ही, प्रसन्न झाली ग || १ ||

                विठू रायाची नवरी झाली ग || धृ ||


भीष्मा राजाची लाडाची लेक,

दिसायला आहे लाखात एक,

लाड लाडाने बावरी झाली ग || २ ||

                विठू रायाची नवरी झाली ग || धृ ||


घरात रुक्मिणी रुसायची, 

विठूला बघून हसायची,

चंद्रभागा प्रगट झाली ग || ३ || 

                विठू रायाची नवरी झाली ग || धृ ||


चंद्रभागेला आलाय पूर,

पुंडलिकाच्या पायरीवर,

देवा देवाची गर्दी झाली ग || ४ ||

                विठू रायाची नवरी झाली ग || धृ ||

No comments:

Post a Comment

धन्य धन्य जन्म ज्याचा

धन्य धन्य जन्म ज्याचा वारकरी पंढरीचा ।।१।। जाय नेमें पंढरीसी । चुकों नेदी तो वारीसी ।।२।। आषाढी कार्तिकी । सदा नाम गाय मुखीं ।।३।। एकाजर्नाध...