Friday, December 24, 2021

काय सांगू तुते ग बाई

काय सांगू तुते ग बाई, काय सांगू तुते

जात होते यमुना पाण्या, वाटेत भेटला सावला..

डोई वर टोपी मयूर पिसाची खांद्यावरी कांबला 

                    काय सांगू  ------- || धृ ||


तेने माझी केली टवाली, मग मी तिथून पलाली

पलता पलता घसलुन पडले डोईची घागर फुटली

माझ्या डोईची घागर फुटली || १ ||

                    काय सांगू  ------- || धृ ||


माझे गुडघे फुटले मग मी ललत बसले

तिकडून आले सारंगपाणी मला पोटासी धरले 

त्यानी मला पोटासी धरले || २ ||

                    काय सांगू  ------- || धृ ||


मला पोटासी धरले, माझे समाधान केले 

निवृत्तीचे कुलपे सुख हे ज्ञानदेवा लादले 

त्यानी ज्ञानदेवा लादले || ३ ||

                    काय सांगू  ------- || धृ ||

No comments:

Post a Comment

धन्य धन्य जन्म ज्याचा

धन्य धन्य जन्म ज्याचा वारकरी पंढरीचा ।।१।। जाय नेमें पंढरीसी । चुकों नेदी तो वारीसी ।।२।। आषाढी कार्तिकी । सदा नाम गाय मुखीं ।।३।। एकाजर्नाध...