आला ग बाई मागल्या दारान
चोरी केली या नंदाच्या पोरांन || धृ ||
बसले होते मी दारात, अवचित आला घरात
याने ग बाई पदर ओढीला ||१||
चोरी केली या नंदाच्या पोरांन
बसले होते मी न्हानित गुलाबाचे फुल वेणीत
याने ग बाई पदर ओढीला ||२||
चोरी केली या नंदाच्या पोरांन
बसले होते मी अंगणात, अवचित आला हा रिंगणात
याने ग बाई पदर ओढीला ||३||
चोरी केली या नंदाच्या पोरांन
एका जनार्दनी नंदाचा कान्हा, देव महात्मा कळे ना कोणा
याने ग बाई पदर ओढीला ||४||
चोरी केली या नंदाच्या पोरांन
No comments:
Post a Comment