Friday, December 24, 2021

समयासी सादर व्हावे

समयासी सादर व्हावे |
देव ठेवील तैसेचि रहावे ||धृ||

कोण्या दिवशी बैसुनी हत्तीवर |
कोण्या दिवशी पालखी सुभेदार |
कोण्या दिवशी पायीचा चाकर |
होहुनी चालावे ||१||

कोण्या दिवशी बैसुनी कणगीवर |
कोण्या दिवशी घरात नाही धान्ये |
कोण्या दिवशी द्रव्याची साठवण |
करून ठेवावे ||२||

कोण्या दिवशी यमयेती चालून |
कोण्या दिवशी प्राण जाती घेऊन |
कोण्या दिवशी स्मशानी जाऊन |
एकटेची बैसावे ||३||

कोण्या दिवशी होईल गुरुकृपा |
कोण्या दिवशी चुकतील चौऱ्यांशीच्या खेपा |
कोण्या दिवशी सावता माळ्या |
दर्शन द्यावे ||४||

No comments:

Post a Comment

धन्य धन्य जन्म ज्याचा

धन्य धन्य जन्म ज्याचा वारकरी पंढरीचा ।।१।। जाय नेमें पंढरीसी । चुकों नेदी तो वारीसी ।।२।। आषाढी कार्तिकी । सदा नाम गाय मुखीं ।।३।। एकाजर्नाध...