देव भुलला भावासी |
सांडूनिया वैकुंठासी ||धृ||
उघड झाला पंढरपुरा |
तो परस्पर सोईरा ||१||
पाहोनीया पुंडलिका |
भुलला तयाच्या कौतुका ||२||
उभा राहिला विटेवरी |
एका जनार्दनीं हरी ||३||
धन्य धन्य जन्म ज्याचा वारकरी पंढरीचा ।।१।। जाय नेमें पंढरीसी । चुकों नेदी तो वारीसी ।।२।। आषाढी कार्तिकी । सदा नाम गाय मुखीं ।।३।। एकाजर्नाध...
No comments:
Post a Comment