सारं गोकुळ फिरूनी पाहू ||धृ||
गोकुळ माझं गाव
आहे गावात माझं नाव ||१||
राधे चल माझ्या गावाला जाऊ
सारं गोकुळ फिरूनी पाहू
वासुदेव माझा पिता
आहे देवकी माझी माता ||२||
राधे चल माझ्या गावाला जाऊ
सारं गोकुळ फिरूनी पाहू
एका जनार्दनीं राधा
राधा लागली हरीच्या नादा ||३||
राधे चल माझ्या गावाला जाऊ
सारं गोकुळ फिरूनी पाहू
No comments:
Post a Comment