देव माझा माझा माझा मी देवाचा ||धृ||
देव सोन्याचा सोनाराने केला
भीती आहे हो चोरांची त्याला ||१||
देव माझा .......
देव लाकडाचा सुताराने केला
भीती आहे हो अग्नीची त्याला ||२||
देव माझा .......
देव मातीचा कुंभाराने केला
भीती आहे हो पाण्याची त्याला ||३||
देव माझा .......
देवाचा मनात निवास
हाच आहे हो कायमचा ध्यास ||४||
देव माझा .......
No comments:
Post a Comment