पुण्याईचा चेक घ्या खुशाल वठवा ||धृ||
आज्ञा पाळा तुम्ही साधू संतांची
लावा गोडी मनी राम नामाची
कुणा सांगू नका कुणा बोलू नका
शुद्ध भक्ती करा आणि राम आठवा ||१||
नाही तुमचे तुम्ही नाही कोणाचे
करा सार्थक जनी नर जन्माचे
झोप घेऊ नका वेळ जाईल फुका
राम नामाचा साठा पुढे पाठवा ||२||
अमर नाही कुणी काळ टपलेला
कधी उचलील कुणा ठावे कोणाला
जर तुम्ही ऐकले तुमचे होईल भले
मार्ग बहुमोल हा तुम्ही जगा पटवा ||३||
No comments:
Post a Comment