Friday, March 8, 2024

हे देवा मल्हारी

हे देवा मल्हारी
देवा जागरणाला यावे
भक्ताला तू पावन व्हावे
होहून कैवारी
हे देवा मल्हारी

जागरण मांडीला दारी
केली आरास मी भारी 
म्हाळसा बानू घेऊन यावे
येऊनिया दर्शन द्यावे
देऊन ललकारी
हे देवा मल्हारी

सोन्याची जेजुरी
नवलाख पायरी
महिमा तुझा भारी मोठा
सुखाला नाही कसला तोटा
माझ्या या संसारी
हे देवा मल्हारी

बानू म्हाळसा या दारी
मधी शोभे तू मल्हारी
नामाची ही लागे गोडी
अशा मजली थोडी थोडी
धावा तू श्री हरी
हे देवा मल्हारी

No comments:

Post a Comment

कशी ठुमकत निघाली गवळण

वाऱ्याच्या वाऱ्याच्या तोलान कशी ठुमकत निघाली गवळण ॥धृ॥ माठ दुधाच डोईवरी, पदर उडतो वाऱ्यावरी पायी पैंजण वाजती रुणझुण ॥१॥ नंदाचा ग श्रीहरी, नक...