जोंधळ्यांच्या भाकरीला चव लय न्यारी ||धृ||
भक्तावरी भोळला पंढरीचा राणा |
शिवारात पिकवितो मोतियांचा दाणा |
मोतियांचे दाणे भरले कणसाकणसावरी ||१||
जनाईच्या जात्यावरी गाऊनिया गाणी |
पांडुरंग गेला बाई वेचावया शेणी |
जनी म्हणे देवा आता काय करू न्याहारी ||२||
-- संतश्रेष्ठ जनाबाई
No comments:
Post a Comment