Friday, December 24, 2021

भाग्यवंता घरी भजन कीर्तन

भाग्यवंता घरी भजन किर्तन |
त्याची वाट पाहे रघुनंदन ||धृ||

जगाच्या बाजरी सर्व काही मिळे |
परी हे दुर्लभ संतजन ||१||

मागील जन्माची असेल पुण्याई |
त्याच्या मुखी राम कृष्ण हरी ||२||

चोखा म्हणे तुम्ही आता तरी जागा |
हरीचे भजन निरंतर करा ||३||

                                        -- संतश्रेष्ठ श्रीचोखोबा महाराज

No comments:

Post a Comment

धन्य धन्य जन्म ज्याचा

धन्य धन्य जन्म ज्याचा वारकरी पंढरीचा ।।१।। जाय नेमें पंढरीसी । चुकों नेदी तो वारीसी ।।२।। आषाढी कार्तिकी । सदा नाम गाय मुखीं ।।३।। एकाजर्नाध...