दुडीवर दुडी गौळणी साथ निघाल्या |
गौळण गोरस म्हणो विसरल्या ||धृ||
गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे |
तवं तवं हासती मथुरेच्या गे ||१||
दुडिया माझारी कान्होबा झाला से भरी |
उचंबळे गोरस सांडे बाहेरी ||२||
एका जनार्दनी सबळस गौळणी |
ब्रम्हानंद न समाये मनी ||३||
No comments:
Post a Comment