Monday, December 20, 2021

पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा

पांडुरंगा पांडुरंगा |

मी पतंग तुझ्या हाती धागा ||धृ||


पंचतत्वांचा केला पतंग |

धागा लाविला निळा रंग ||१||


साही शास्त्रांचा सुटलाय वारा |

चारी वेदांचा आधार त्याला ||२||


तुका म्हणे मी झालो पतंग |

धागा आवरा हो पांडुरंगा ||३|| 

No comments:

Post a Comment

धन्य धन्य जन्म ज्याचा

धन्य धन्य जन्म ज्याचा वारकरी पंढरीचा ।।१।। जाय नेमें पंढरीसी । चुकों नेदी तो वारीसी ।।२।। आषाढी कार्तिकी । सदा नाम गाय मुखीं ।।३।। एकाजर्नाध...