तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला ||धृ||
आषाढी कार्तिकी एकादशीला |
साधू संत येती तुझ्या दर्शनाला ||१||
पुंडलिका भेटी परब्रम्ह आले |
फेकली वीट त्याने देव उभे राहिले ||२||
गोदाई म्हणे विठ्ठल सावळा |
वेडे केले त्याने साऱ्या जगाला ||३||
धन्य धन्य जन्म ज्याचा वारकरी पंढरीचा ।।१।। जाय नेमें पंढरीसी । चुकों नेदी तो वारीसी ।।२।। आषाढी कार्तिकी । सदा नाम गाय मुखीं ।।३।। एकाजर्नाध...
No comments:
Post a Comment