गिरीशिखरी किरीटावरी लहरी भगवा ध्वज
उगवला तारा तिमिरहरा गर्जा शिवाजी राजा ||धृ||
युगा युगाचा गडकंधार |
यैवन चाकरी करी सरदार |
मराठी मर्दा होहून करदा |
छाटल्या शत्रूच्या भुजा ||
उगवला तारा तिमिरहरा गर्जा शिवाजी राजा ||धृ||
तळपे हाती नंगी तलवार |
होहुनी राणा कृष्ण बलसार |
हर हर करी दरी कपारी |
उधळल्या राजाच्या फौजा ||
उगवला तारा तिमिरहरा गर्जा शिवाजी राजा ||धृ||
भवानी आईचा कृपा वरद |
भिडतंय खानाचा करुनी वध |
गाडूनी यैवना करिती दैना |
मातीला मिळाल्या पैजा ||
उगवला तारा तिमिरहरा गर्जा शिवाजी राजा ||धृ||
No comments:
Post a Comment