यमुनेच्या तिरी काल पाहिला हरी | ओ ओ ओ
कान्हा वाजवी बासरी ||धृ||
बारा सोळा गौळयाच्या नारी |
त्या नटूनी चालल्या मथुरा बाजारी |
त्याने मारला खडा न माझा फोडला घडा |
त्याने फोडील्या घागरी ||१|| ओ ओ ओ
यशोदा बोले बाळ श्रीहरी |
तू छेडू नको रे गोकुळ नगरी |
राधिकेच्या घरी कान्हा पलंगावरी | ओ ओ ओ
राधा झाली ग बावरी |
कान्हा वाजवी बासरी ||२||
एका जनार्दनी गवळण राधा |
ती विनवी तुजला अरे मुकुंदा |
गवळ्याची नार करी सोळा शृंगार | ओ ओ ओ
लिन झाली चरणावरी |
कान्हा वाजवी बासरी ||३||
No comments:
Post a Comment