Friday, December 24, 2021

देव माझा (सत्य हीच माझी वाचा)

देव माझा मी देवाचा 

सत्य हीच माझी वाचा.... ॥धृ॥


देह देवाचे देऊळ 

आत बाहेर निर्मळ.... ॥१॥


देव पाहायला गेले 

तेथे देवची होऊनी ठेलो.... ॥२॥


तुका म्हणे धन्य झाले 

आज म्या विठ्ठल भेटलो.... ॥३॥


                                        -- संतश्रेष्ठ जगद्गुरू श्रीतुकाराम महाराज

No comments:

Post a Comment

धन्य धन्य जन्म ज्याचा

धन्य धन्य जन्म ज्याचा वारकरी पंढरीचा ।।१।। जाय नेमें पंढरीसी । चुकों नेदी तो वारीसी ।।२।। आषाढी कार्तिकी । सदा नाम गाय मुखीं ।।३।। एकाजर्नाध...