बाबा तुम्ही आमच्या साठी कष्ट केले फार..
लेकी सुना रडती सारे बसून कोपऱ्याला..
दास म्हणे जगामधे बाप आणि आई...
तू सुखकर्ता तू दुः खहर्ता विघ्न विनाशक मोरया
संकटी रक्षी शरण तुला मी, गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती तू गणनायक, वक्रतुंड तू सिद्धिविनायक
तुझिया द्वारी आज पातलो, ये इच्छित मज द्याया
तू सकलांचा भाग्य विधाता, तू विद्येचा स्वामी दाता
ज्ञानदीप उजळून आमुचा निमवी नैराश्याला
तू माता तू पिता जगी या, ज्ञाता तू सर्वस्व जगी या
पामर मी, स्वर उणे भासती तुझी आरती गाय
अशी चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग
गोऱ्या गणपतीला फुलून
माळ शोभली ग
अशी चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग
त्याने गोड हासुनी
मोठा आशीर्वाद दिला ग
चला चला करूया नमन
गणराया ला ग
त्याचा आशीर्वाद ने
करू सुरुवात शुभ करायला ग
अशी चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग
देव माझा मी देवाचा
सत्य हीच माझी वाचा.... ॥धृ॥
देह देवाचे देऊळ
आत बाहेर निर्मळ.... ॥१॥
देव पाहायला गेले
तेथे देवची होऊनी ठेलो.... ॥२॥
तुका म्हणे धन्य झाले
आज म्या विठ्ठल भेटलो.... ॥३॥
-- संतश्रेष्ठ जगद्गुरू श्रीतुकाराम महाराज
आधी रचिली पंढरी ।
मग वैकुंठ नगरी ॥१॥
जेव्हा नव्हते चराचर ।
तेव्हा होते पंढरपूर ॥२॥
जेव्हा नव्हती गोदा गंगा ।
तेव्हा होती चंद्रभागा ॥३॥
चंद्रभागेचे तटी ।
धन्य पंढरी गोमटी ॥४॥
नासिलीया भूमंडळ ।
उरे पंढरीमंडळ ॥५॥
असे सुदर्शनावरी ।
म्हणुनी अविनाशी पंढरी ॥६॥
नामा म्हणे बा श्रीहरी ।
आम्ही नाचु पंढरपुरी ॥७॥
-- संतश्रेष्ठ श्रीनामदेव महाराज
काय सांगू तुते ग बाई, काय सांगू तुते
जात होते यमुना पाण्या, वाटेत भेटला सावला..
डोई वर टोपी मयूर पिसाची खांद्यावरी कांबला
काय सांगू ------- || धृ ||
तेने माझी केली टवाली, मग मी तिथून पलाली
पलता पलता घसलुन पडले डोईची घागर फुटली
माझ्या डोईची घागर फुटली || १ ||
काय सांगू ------- || धृ ||
माझे गुडघे फुटले मग मी ललत बसले
तिकडून आले सारंगपाणी मला पोटासी धरले
त्यानी मला पोटासी धरले || २ ||
काय सांगू ------- || धृ ||
मला पोटासी धरले, माझे समाधान केले
निवृत्तीचे कुलपे सुख हे ज्ञानदेवा लादले
त्यानी ज्ञानदेवा लादले || ३ ||
काय सांगू ------- || धृ ||
गली गली धूम मचायो रे
मारो नंदाजीका छोकरा || धृ ||
यशोदा नो कन्हैया देवकी दा लाडला |
सुंदर बनसी बजायो रे || १ ||
माथे पे मुकुट रूप कान्हो सावळा |
होली खेलने आयो रे || २ ||
मीरा कहे मारो मदन मोहन से |
खुशियों का प्याला पियो रे || ३ ||
-- संतश्रेष्ठ मीराबाई
सांग सुदाम्या हरीचा चेंडू |
पाण्यात गेला कसा ||
हा जीव माझा, हा जीव माझा |
झालाय वेडा पिसा || धृ ||
जमली सगळी गोकुळ नगरी |
अजुनी येई ना कसा || १ ||
गाई वासरे हंबरती |
रानात बसला कसा || २ ||
एका जनार्दनी पूर्ण कृपेने |
कंस मामा मारिला कसा || ३ ||
-- संतश्रेष्ठ श्रीएकनाथ महाराज
विठ्ठल विठ्ठल म्हणतील सगळे विठ्ठल कितीसे दूर
इमानदारांच्या समीप अन बैमानापासून दूर
उभा कसा राहिला विटेवरी
पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला
उभा कसा राहिला विटेवरी || धृ ||
अंगी शोभे पितांबर पिवळा,
गळ्यामध्ये वैजयंती माळा,
चंदनाचा टीळा माथी शोभला -२
उभा कसा राहिला विटेवरी || १ ||
चला चला पंढरीला जाऊ,
डोळे भरुनी विठू माउलीला पाहू,
भक्ती मार्ग आम्हाला त्याने दाविला -२
उभा कसा राहिला विटेवरी || २ ||
ठेवूनिया दोन्ही कर कटी,
उभा हा मुकुंद वाळवंटी,
हरिनामाचा झेंडा तिथे रोविला,
उभा कसा राहिला विटेवरी || ३ ||
बाळ श्रावण प्रार्थी आता,
नका दूर लोटू पंढरीनाथ,
तव चरणी हा देह सारा वाहिला,
उभा कसा राहिला विटेवरी || ४ ||
घोंगडीवाला कांबळीवाला |
राधे तुला पुसतो घोंगडीवाला || धृ ||
जमवुनि पोरें गेला यमुनेच्या तिरीं |
वांटितो गोपाळकाला || राधे॰ || १ ||
रात्री माझ्या मंदिरीं आला |
निरोप सांगुनि गेला || राधे॰ || २ ||
हाति घेऊनियां वेणू |
नेसुनि पितांबर पिंवळा || राधे॰ || ३ ||
जनी म्हणे विठू हा आला ||
गळां वैजयंतीच्या माळा || राधे || ४ ||
-- संतश्रेष्ठ जनाबाई
धरिला पंढरीचा चोर |
गळा बांधुनिया दोर || धृ ||
हृदय बंदिखाना केला |
आत विठ्ठल कोंडीला || १ ||
शब्दे केली जडाजुडी |
विठ्ठल पायी घातली बेडी || २ ||
सोहं शब्दांचा मारा केला |
विठ्ठल काकुळती आला || ३ ||
जनी म्हणे बा विठ्ठलां |
जीवे न सोडी मी तुजला || ४ ||
-- संतश्रेष्ठ जनाबाई
ज्या सुखा कारणे देव वेडावला,
वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला || धृ ||
धन्य धन्य संताचे सदन
तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण || १ ||
सर्व सुखाची सुखराशी,
संत चरणी भक्ती मुक्ती दासी || २ ||
एका जनार्दनी पार नाही सुखा,
म्हणोनी देव भुलले से देखा || २ ||
-- संतश्रेष्ठ श्रीएकनाथ महाराज
गायी चराया रानात गेला गं माझा गोपाळ घोंगडीवाला
गोपाळ घोंगडीवाला, माझा गोपाळ घोंगडीवाला
कैसा गौळणीच्या रंगात रंगला रं, माझा गोपाळ घोंगडीवाला ||धृ||
काय सांगू तरी माझा जरी, माझा सखा जरी, जातो गौवळ्याघरी
माझा सखा जरी, जातो गौवळ्याघरी
कैसा गौळणीच्या रंगात रंगला रं, माझा गोपाळ घोंगडीवाला ||१||
ही गौवळ्याची पोरं, याला म्हणताती चोरं, कैसा रिकामा पोरं
याला म्हणताती चोरं, कैसा रिकामा पोरं
कैसा गौळणीच्या रंगात रंगला रं, माझा गोपाळ घोंगडीवाला ||२||
एका जनार्दनी हरी कुंजवना, हरी कुंजवना, गाई राना वना
हरी कुंजवना, गाई राना वना
देव इंद्रायणी थांबला,
देव देव इंद्रायणी थांबला ||धृ||
पंढरीचा पांडुरंग आळंदीसी आला |
भक्ती भावाने एकरूप झाला ||१|||
ज्ञानोबा माऊली तुकाराम ....... |
म्हणे मुक्ताबाई चमत्कार झाला |
समाधी घेता हात थरथरला ||२||
ज्ञानोबा माऊली तुकाराम ....... |
एका जनार्दनी इंद्रायणी आठवा |
उजळून निघाले आळंदी हे गाव ||३||
ज्ञानोबा माऊली तुकाराम ....... |
-- संतश्रेष्ठ श्रीएकनाथ महाराज
अरे अरे अरे नको नको नको हात घालू डेऱ्यात |
तुला गोडीने सांगते मारीन गालात ||धृ||
दही ठेवलाय चिंच्यावरी, म्हणतो दे मजला लवकरी |
चिंचे तोडूनी माठ फोडुनी आणलाय दारात ||१||
तुला गोडीने सांगते मारीन गालात ||धृ||
तुला बांधील उकळाला, दोर बांधिला पायाला |
गर गर गर उकळ फिरून, आणलाय दारात ||२||
तुला गोडीने सांगते मारीन गालात ||धृ||
एका जनार्दनी हे भाव, सद्गुरूला शरण जावं |
रंग सावळा रूप गोजिरे भरलंय मनात ||३||
तुला गोडीने सांगते मारीन गालात ||धृ||
-- संतश्रेष्ठ श्रीएकनाथ महाराज
छंद नाही नामाचा |
देह काय कामाचा ||धृ||
ज्याने तुला जन्म दिला |
तू तर त्याला विसरला ||१||
ज्ञान बुद्धी नाही तुला |
खोट्याच्या मागे गेला ||२||
बहिण भाऊ इष्ट मित्र |
कुणी नाही कुणाचे ||३||
तुका म्हणे भजन करा |
मानव जन्म नाही पुन्हा ||४||
-- संतश्रेष्ठ जगद्गुरू श्रीतुकाराम महाराज
रूप घेउनी कासार झाला |
हरी बांगड्या विकाया आला ||
बाई खट्याळ हा नंदलाला |
हरी बांगड्या विकाया आला ||धृ||
नक्षीदार हिऱ्या मोत्यांनी |
रंगी बेरंगी त्याच्या सरी |
चुडा भरून घ्या पोरीनो म्हणाला ||१||
हरी बांगड्या विकाया आला ||धृ||
कसा भरला हाती तो मला चुडा |
त्याच्या भक्तीमध्ये जीव झाला वेडा |
कुठल्या किंमतीचा दाम देऊ त्याला ||२||
हरी बांगड्या विकाया आला ||धृ||
कधी डाव्या हाती, कधी उजव्या हाती |
न्याहाळले मी त्याच्या हाती |
मन मोहून तल्लीन झाला ||३||
हरी बांगड्या विकाया आला ||धृ||
पदराला धरू नको मस्करी करू नको
वाट माझी सोड
अरे कान्हा पदराला धरू नको सोड
अरे कृष्णा, घनश्यामा पदराला धरू नको सोड
मी राधा गोरी, तू कृष्ण काळा
तुझा माझा जमेल कसा जोड
अरे कान्हा ........... ||१||
जाऊन सांगेन नंद मामंजीला
मोडेल तुझी खोड
अरे कान्हा ........... ||२||
एका जनार्दनी पूर्ण कृपेने
नाम तुझे बहु गोड
अरे कान्हा ........... ||३||
-- संतश्रेष्ठ श्रीएकनाथ महाराज
देव भुलला भावासी |
सांडूनिया वैकुंठासी ||धृ||
उघड झाला पंढरपुरा |
तो परस्पर सोईरा ||१||
पाहोनीया पुंडलिका |
भुलला तयाच्या कौतुका ||२||
उभा राहिला विटेवरी |
एका जनार्दनीं हरी ||३||
करूया प्रथम नमन
वंदू देव गजानन ||धृ||
सकळ सिद्धींचा हा विधाता
आले विघ्न निवारिता ||१||
गौरी हराचा हा कुमार
याचे नाव लंबोदर ||२||
देव गणांचा गणपती
तुका म्हणे राहो चित्ती ||३||
दुडीवर दुडी गौळणी साथ निघाल्या |
गौळण गोरस म्हणो विसरल्या ||धृ||
गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे |
तवं तवं हासती मथुरेच्या गे ||१||
दुडिया माझारी कान्होबा झाला से भरी |
उचंबळे गोरस सांडे बाहेरी ||२||
एका जनार्दनी सबळस गौळणी |
ब्रम्हानंद न समाये मनी ||३||
मन लागो रे लागो, मन लागो रे लागो |
मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी ||
गुरुदत्तच्या चरणी दत्त नामाच्या कीर्तनी |
गुरुभक्तीच्या पूजनी मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी ||धृ||
गुरु माझे दत्त दिगंबर।
ब्रह्मा विष्णू तोची महेश्वर तोची महेश्वर ||१||
नाम घ्यावे आवडीने |
व्हावे पावन गुरु भक्तीने ||२||
गुरु चरणांची हि गोडी |
मोह माया बंधन तोडी ||३||
खंडेराया देवराया…
थाटुन आलासा नळदुर्गाला…
घेऊन जाया बानुबया…
ऐटीत बांधलासा मुंडावळ्या…
मंडप आभाळी इंद्रधनुचा…
भूमिला स्पर्श झाला देवगणांचा…
नटुन थटुन बसली बया ही बघाया खंडेराया…
बानुबया बानुबया बानुबया बानुबया…
हा निघाली ही बघाया खंडेराया…
श्रध्देचा गाठुन डोंगर हिच्या भक्तिनं गाठला हा दिवस असा,
हळदीनं भरुनिया ओंजळ देवरायानं दिला जणु जन्म नवा..
गणपती ही गाली हसे नंदी बघा कसा नाचे…
हे गणपती ही गाली हसे नंदी बघा कसा नाचे…
डमरुचा नाद भिडे तो गगणाला..
शंख नाद होई तिथं जेजुरीला…
नटुन थटुन बसली बया ही बघाया खंडेराया..
बानुबया बानुबया बानुबया बानुबया…
हा निघाली ही बघाया खंडेराया…
कशी नटलीया सजलीया बानुबया..
गोड गालात हसतीया बानुबया…
ऊर दाटुन बघतीया आल्या मेळा…
कशी जिवाची घालमेल बानुबया…
व्रतवैकल्याच्या माळा हिनं माळल्या हो मोठ्या शर्तिनं…
सोसुन शत शत पिडा हिला स्विकारल भोळ्या मल्हारीनं…
लक्ष्मी सरस्वती आली, ब्रम्हा विष्णु अवतरले…
अर लक्ष्मी सरस्वती आली न् ब्रम्हा विष्णु अवतरले,
नारद मुनिंनी स्वर आळविला…
मंगलाष्टकांचा स्वर गगणी भिडला…
नटुन थटुन बसली बया ही बघाया खंडेराया…
बानुबया बानुबया बानुबया बानुबया…
हा निघाली ही बघाया खंडेराया… …
आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला
अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला
आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी
आज गोंधळाला ये ....
गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये
गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये
उधं उधं उधं उधं उधं
गळ्यात घालून कवड्याची माळ पायात बांधिली चाळ
हातात परडी तुला ग आवडी वाजवितो संबळ
धगधगत्या ज्वालेतून आली तूच जगन्माता
भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता
आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी
आज गोंधळाला ये ....
गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये
गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये
उधं उधं उधं उधं उधं
अग सौख्यभरीला माणिकमोती मंडप आकाशाचा
हात जोडुनि करुणा भाकितो उद्धार कर नावाचा
अधर्म निर्दाळुनी धर्म हा आई तूच रक्षिला
महिषासुर-मर्दिनी पुन्हा हा दैत्य इथे मातला
आज आम्हांवरी संकट भारी धावत ये लौकरी
अंबे गोंधळाला ये
गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये
गोंधळ मांडला ग अंबे गोंधळला ये
अंबाबाईचा ..... उधं उधं उधं उधं उधं
बोल भवानी मातेचा ..... उधं उधं उधं उधं उधं
साई तुझे मिलने का पालखी का बहाना है |
साई तुझे मिलने का शिर्डी का बहाना है ||१||
साई तुझे मिलने का .........
दुनियावाले क्या जाने | हम तेरे दिवाने है ||धृ||
कालियों में धुंढा तुझे | फुलों में पाया है |
इस फुल और गुलशन मी साई तेरा बसेरा है ||२||
साई तुझे मिलने का ........
सुरज में धुंढा तुझे | चंदा में पाया है |
इस चांद और सुरज मे साई तेरा बसेरा है ||३||
साई तुझे मिलने का ........
भक्ती वाचुनी मुक्तीची मज जडली रे व्याधी
विठ्ठला, मीच खरा अपराधी ||धृ||
ज्ञानेशाचे अमृत अनुभव |
अनुकंपेचे नेत्री आसव |
स्वप्न तरल हे नकळे शैशव |
नुरलो त्यात कधी ||१||
संत तुक्याची अभंगवाणी |
इंद्रायणीचे निर्मळ पाणी |
मीच बुडविला दुष्ट यौवनी |
करुणेचा हा निधी ||२||
तरले तरले स्वच्छंदीपण |
नुरले यौवन नुरले मीपण |
परी न रमले हे मन |
तुझ्या चिंतने कधी ||३||
घेउनी आलो नैवद्याला मजवरी का रुसला |
एकतरी घास तू घे विठ्ठला ||धृ||
भूक नाके का तुला लागली,
माता लक्ष्मी कशी आठवली,
मजवरी का रुसला ........ ||१||
सुदाम्याचे मुठभर पोहे,
कसे खायिले तू आवडीने,
मजवरी का रुसला ........ ||२||
शबरीची उष्टी बोरे,
कशी खाईली तू आवडीने,
मजवरी का रुसला ........ ||३||
एका जनार्दनी नाम्या गहिवरला
विठ्ठल नाम्या संगे जेविला
मजवरी का रुसला ........ ||४||
नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा |
फोडी पाषाणाला पान्हा ||धृ||
नाम जपले वाल्मिकाने |
फुटली टोणप्याला पाने ||१||
अजामेळा पापराशी |
तो ही नेला देवा वैकुंठासी ||२||
ऐसा नामाचा महिमा |
तुका म्हणे देवा झाली सीमा ||३||
पांडुरंगा पांडुरंगा |
मी पतंग तुझ्या हाती धागा ||धृ||
पंचतत्वांचा केला पतंग |
धागा लाविला निळा रंग ||१||
साही शास्त्रांचा सुटलाय वारा |
चारी वेदांचा आधार त्याला ||२||
तुका म्हणे मी झालो पतंग |
धागा आवरा हो पांडुरंगा ||३||
तू सुखकर्ता तु दु:खहर्ता । विघ्नविनाशक मोरया
संकटी रक्षी शरण तुला मी । गणपती बाप्पा मोरया ॥ धृ ॥ १ ॥
तू सकलांचा भाग्य विधाता । तूं विद्येचा स्वामीदाता ।
ज्ञानदीप उजळुनी आमुच्या निववी नैराश्याला ॥ २ ॥
तू माता तू पिता जगी या । ज्ञाता तू सर्वस्व जगी या ॥
पामर मी स्वर उणे भासती । तुझी आरती गाया ॥ ३ ॥
मंगलमूर्ति तूं गणनायक । वक्रतुंड तूं सिद्धि विनायक ।
तूझीया द्वारे आज पातली । ये इच्छित मज द्याया ॥ ४ ॥
जय देवा, जय देवा, जय देवा, जय देवा, जय देवा जय शिव मार्तंडा…
जय देवा, जय देवा, जय देवा, जय देवा, जय देवा जय शिव मार्तंडा…
हरी मदन मल्हारी तूची प्रचंडा…
अगड धूम नगारा सोन्याची जेजुरी,
देव गेले जेजुरा निळा घोडा…
अगड धूम नगारा सोन्याची जेजुरी
देव गेले जेजुरा निळा घोडा…
पाव मे तोडा… कमरी करगोटा,
बेंबी हिर, मस्तकी तुरा…
खोबर्याचा कुटका.. भंडार्याचा भडका
बोल अहंकरा, सदानंदाचा येळकोट…
जय देवा, जय देवा, जय देवा, जय देवा, जय देवा जय शिव मार्तंडा…
जय देवा, जय देवा, जय देवा, जय देवा, जय देवा जय शिव मार्तंडा…
हरी मदन मल्हारी तूची प्रचंडा…
सदानंदाचा येळकोट
येळकोट येळकोट जय मल्हार
तूच सुखकर्ता तूच दुखहर्ता अवघ्या दिनांच्या नाथा
बाप्पा मोरया रे …॥
चरणी ठेवितो माथा॥
पहा झाले पुरे एक वर्ष, होतो वर्षान एकदाच हर्ष
गोड अन्नाचा होतो रे स्पर्ष, घ्यावा संसाराचा परामर्ष
पुर्या वर्षाची सार्या दुखाची, वाचावी कशी मी गाथा॥
बाप्पा मोरया रे …॥
चरणी ठेवितो माथा
नाव काढू नको तान्दुळाचे , केले मोदक लाल गव्हाचे
हाल ओळख सार्या घराचे, दिन येतील का रे सुखाचे
सेवा जाणुनी गोड मानुनी,द्यावा आशिर्वाद आता ॥
बाप्पा मोरया रे …॥
चरणी ठेवितो माथा
आली कशी पहा आज वेळ, कसा बसावा खर्चाचा मेळ
प्रसादाला दूध आणी केळ,सार्या प्रसादाची केली भेळ
गुण गाइन आणी राहीन, द्यावा आशिर्वाद बाप्पा॥
अशी चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग
या चिक माळेला
रेशमी बावशार दोरा ग
माऊ रेशमाच्या दोऱ्यात
नौरंगी माळ ओविली ग
अशी चिक मोत्याची .....
अशा चिक माळेला
हिऱ्याचे आठ आठ पदर ग
अशी तीस तोळ्याची माळ
गणपतीला ग घातली ग
अशी चिक मोत्याची .....
जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग
गोऱ्या गणपतीला फुलून
माळ शोभली ग
चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग
त्याने गोड हासुनी
मोठा आशीर्वाद दिला ग
चला चला करूया नमन
गणराया ला ग
त्याचा आशीर्वाद ने
करू सुरुवात शुभ करायला ग
अशी चिक मोत्याची .....
जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग
नदीच्या पल्याड आईचा डोंगुर
डोंगरमाथ्याला देवीचं मंदिर
घालु जागर जागर डोंगरमाथ्याला
घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन, रांगून, डोंगरडों येंगून, उघड देवी दार
नदीच्या पान्यावर आगीनं फुलतं
तुझ्या नजरेच्या तालावर काळीज डुलतं
नाद आला ग आला ग जिवाच्या घुंगराला
घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन, रांगून, डोंगरडों येंगून, उघड देवी दार
नवसाला पाव तू, देवी माझ्या हाकंला धाव तू
हाकंला धाव तू, देवी माझ्या अंतरी र्हाव तू
देवी माझ्या अंतरी र्हाव तू, काम क्रोध परतुनी लाव तू
काम क्रोध परतुनी लाव तू, देवी माझी पार कर नाव तू
डोळा भरून तुझी मुरत पाहीन
मुरत पाहीन, तुझा महिमा गाईन
महिमा गाईन, तुला घुगर्या वाहीन
घुगर्या वाहीन, तुझा भंडारा खाईन
दृष्ट लागली लागली हळदीच्या अंगाला
घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन, रांगून, डोंगरडों येंगून, उघड देवी दार
यल्लम्मा देवीचा जागर ह्यो, भक्तीचा सागर
निवदाची भाकर दाविती ही जमल्या ग लेकरं
पुनवंचा चांदवा देवीचा ग मायेचा पाझर
आई तुझा मायेचा पाझर, जागर ह्यो, भक्तीचा सागर
खणा-नारळानं वटी मी भरीन
वटी मी भरीन, तुझी सेवा करीन
सेवा करीन, तुझा देवारा धरीन
देवारा धरीन, माझी वंजळ भरीन
आई सांभाळ सांभाळ कुशीत लेकराला
घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन, रांगून, डोंगरडों येंगून, उघड देवी दार
यल्लम्मा देवीचा जागर ह्यो, भक्तीचा सागर
निवदाची भाकर दाविती ही जमल्या ग लेकरं
पुनवंचा चांदवा देवीचा ग मायेचा पाझर
आई तुझा मायेचा पाझर, जागर ह्यो, भक्तीचा सागर
गजानना गजानना गणराया गणराया
मुखाने गाऊ या मोरया ...... ||धृ||
फळे फुले व्हाऊया पूजन करूया
लाडू मोदकांचा नैवद्य दाऊया
भक्तीभावने गणेशाला वंदूया, गणेशाला वंदूया ||१||
मुखाने गाऊ या मोरया ...... ||धृ||
देव देवतांच्या हे महाराजा
नाम तुझे राहो सदा मुखी माझ्या
चौदा विद्यांच्या देवा असे कृपया, देवा असे कृपया ||२||
मुखाने गाऊ या मोरया ...... ||धृ||
हे मोरेश्वरा हे विघ्नहरा
गुण किती वर्णू तुझे लंबोदरा
भजन करुनी गणपतीचा घोष करूया ||३||
मुखाने गाऊ या मोरया ...... ||धृ||
गजानना श्री गणराया |
आधी वंदू तुज मोरया ||
मंगलमूर्ती श्री गणराया |
आधी वंदू तुज मोरया ||
सिंदूर चरित ढवळे अंग |
चंदन उती खुलावी रंग ||
बगटा मानस होटे डांग |
जीव जादला चरणी तुजिया ||
गौरी तनया भालचंद्र |
देवा कृपेच्य तू समुद्र ||
वरद विनायक करुणा गं |
अवघी विघ्न नेसी विलाया ||
धन्य धन्य जन्म ज्याचा वारकरी पंढरीचा ।।१।। जाय नेमें पंढरीसी । चुकों नेदी तो वारीसी ।।२।। आषाढी कार्तिकी । सदा नाम गाय मुखीं ।।३।। एकाजर्नाध...