तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढीतो //धु//
बाजारी जाता घोर वाटे जीवाला
कुठून अचानक येतो आडवा वाटेला
दही दूध चोरून माझा घडा फोडीतो
तुझा कृष्ण कन्हैया माझी छेड काढीतो //1//
जमवूनी गोपि राधा सांगे गवळणीना
गोकुळात साऱ्या कान्हा घालितो धिंगाणा गोठातल्या गाई म्हशी तो ग सोडीतो
तुझा कृष्ण सावळा ग माझी छेड काढतो//2//
यशोदा म्हणे आता बांधुनी उखळला
समजावून सांगते मी माझ्या बाळाला
विनवूनी त्याला आज हात जोडीतो
तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढीतो //3//
No comments:
Post a Comment