आज नेतो गं राधे तुला, माझ्या गोकुळ नगरीला || धृ ||
मी गवळ्याची राधा, तू नंदाचा कान्हा
तुला सोडून राधिके, मला तीळभर करमेना
कोणी सोडणार नाही ग,
राधा कृष्णाच्या जोडीला
आज नेतो गं राधे तुला,
माझ्या गोकुळ नगरीला || १ ||
मी नंदाचा कान्हा, तू गवळ्याची राधा
भूललो ग राधिके, तुझ्या गोर्या रंगाला
कोणी सोडणार नाही ग,
राधा कृष्णाच्या जोडीला
आज नेतो गं राधे तुला,
माझ्या गोकुळ नगरीला || २ ||
एका जनार्दनी गवळण राधा,
खोटं बोलू नको कान्हाला
कोणी सोडणार नाही ग,
राधा कृष्णाच्या जोडीला
आज नेतो गं राधे तुला,
माझ्या गोकुळ नगरीला || ३ ||
राधा आलिया गोडीला, येऊन बसली जोडीला
आज नेतो गं राधे तुला, माझ्या गोकुळ नगरीला
No comments:
Post a Comment