Monday, October 5, 2026

जय देवा जय देवा भैरवा शिव अवतारा

जय देव जय देव भैरवा शिव अवतारा, शिव अवतारा, 
आरती ओवाळू, आरती ओवाळू, माझ्या काळभैरवा !!

काळ्या घोडयावरती देव माझा निघाला, 
देव माझा निघाला सोनारी गावात. त्यानं दैत्य मारीला !. 
जय देव....

काल भैरव नाथ आहे भक्त कैवारी देव भक्ताचा कैवारी
जोगेश्वरी कांता आहे त्याच्या शेजारी 
जय देव... 

अरे कापराच्या ज्योती लावून, आरती ओवाळू चला आरती ओवाळू, 
या भैरी गा नाथाची.. चला दिवटी पाजळू !! 
जय देव....

No comments:

Post a Comment

कशी ठुमकत निघाली गवळण

वाऱ्याच्या वाऱ्याच्या तोलान कशी ठुमकत निघाली गवळण ॥धृ॥ माठ दुधाच डोईवरी, पदर उडतो वाऱ्यावरी पायी पैंजण वाजती रुणझुण ॥१॥ नंदाचा ग श्रीहरी, नक...