Sunday, October 15, 2023

जाऊ दे घट भरण्या यमुनेला

जाऊ दे घट भरण्या यमुनेला |
मला रे अडवू नको नंदलाला |
नंणद माझी चावट भारी चाड्या चूगल्या सांगेल घरी ।।१।।

जाऊन सांगेल रे नवरयाला ।
मला रे अडवू नको नंदलाला ।
पहरा देत माझी सासु माझ्या शेजारी नको रे बसु ।।१।।

कोणीतरी सांगेल सासरयाला ।
मला रे अडवू नको नंदलाला ।
सासुरवासनी मी गवळ्याची नार रे जिवाला लावीतोस घोर ।।१।।

जाऊ दे उशीर लावू कशाला ।
मला रे अडवू नको नंदलाला ।
सोड जाऊ दे माघारी येते माघ शील ते दान तुला देते ।।१।।

मानो जया गुपीत नको सागुं कोणाला ।
मला रे अडवू नको नंदलाला ।
जाऊ दे घट भरण्या यमुनेला ।।२।।
मला रे अडवू नको नंदलाला ।।३।।

धन्य धन्य जन्म ज्याचा

धन्य धन्य जन्म ज्याचा वारकरी पंढरीचा ।।१।। जाय नेमें पंढरीसी । चुकों नेदी तो वारीसी ।।२।। आषाढी कार्तिकी । सदा नाम गाय मुखीं ।।३।। एकाजर्नाध...