Monday, April 3, 2023

काळया रंगाचं कुरळ्या केसांच

काळया रंगाचं, अन् कुरळ्या केसांच
पोरगं कुणाचं ग बाई पोरगं कुणाचं || धृ ||

भर दुपारी घरात येतो
दही दूध तूप लोणी चोरून खातो
वेणी ओढीतो ग माझी वेणी ओढितो
पोरगं कुणाचं ग .....   || १ ||

दही दूध घेऊनी मथुरेसी जाता
आड रस्त्यावर कृष्ण उभा होता 
खोडी काढीतो ग माझी खोडी काढितो
पोरगं कुणाचं ग ..... || २ ||

एका जनार्दनी विनविते राधा
शरण मी आले तुला मुकुंदा 
मोठया मनाचं पोरगं नंदाच
पोरगं नंदाच ग बाई पोरगं नंदाच ..... || ३ ||

मोठया मनाचं पोरगं नंदाच
पोरगं कुणाचं ग ..... 



मी लाविली तुळस

हासत खेळत बाई
मी लाविली तुळस || धृ ||

तुळसीचे मूळ 
माझ्या विठ्ठलाचे कुळ ||१||

तुळसीचे पान
माझ्या विठ्ठलाचे ध्यान ||२||

तुळसीच्या मंजुळा
घालू विठ्ठलाच्या गळा ||३||

घालू तुळशीला पाणी
म्हणे नामयाची जनी ||४||






धन्य धन्य जन्म ज्याचा

धन्य धन्य जन्म ज्याचा वारकरी पंढरीचा ।।१।। जाय नेमें पंढरीसी । चुकों नेदी तो वारीसी ।।२।। आषाढी कार्तिकी । सदा नाम गाय मुखीं ।।३।। एकाजर्नाध...